घोडबंदर रस्त्यावर भीषण अपघात; मायलेकी जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी। ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातातील महिलेच्या पतीची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे.

ठाण्यात राहणारे दिलीप विषवकर्मा हे आपली पत्नी लीलावती व मुलगी प्रांजळ बरोबर भाइंदर या ठिकाणावरून घरी परतत होते. त्याचवेळी घोडबंदर रोडवरील भाइंदर पाडा या ठिकाणी एका भरधाव ट्रॅकने दिलीप यांच्या मोटारसायकलला टक्कर दिली. हा अपघात इतका भीषण होता की, आई व मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील उपस्थित नागरिकांनी या सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तपासणी नंतर डॉक्टरांनी मायलेकींना मृत घोषित केलं. या अपघातात दिलीप यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अजून उपचार सुरु आहेत.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतल आहे. कासारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून ते पुढील चौकशी करत आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment