सांगलीतील जसलोक बेकरी अखेर सील 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मारुती रोडवरील आनंद थिएटर समोर विनापरवाना सुरू असणारी बहुचर्चित जसलोक बेकरी अखेर आज सील करण्यात आली. आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे आणि त्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. गेली अनेक महिने ही बेकरी विनापरवाना सुरू होती.

याबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर आज आरोग्य विभागाने ही कारवाई केली. सांगलीच्या मारुती रोडवरील आनंद टॉकीज समोर जसलोक स्वीटस नावाने ही बेकरी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती. याबाबत माहिती अधिकाराच्या माहितीत जसलोक स्वीटसला महापालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगीच नसल्याचे उघडकीस आले होते. या नुसार आयुक्त खेबुडकर यांनी जसलोक बेकरीवर कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार १५ दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने जसलोक बेकारीची उत्पादन भट्टी सील करून नाशवंत माल विक्रीसाठी ३ दिवसाची मुदत दिली होती मात्र या तरीही सदरची बेकरी नियमबाह्य सुरू असल्याचे निदर्शनास येताच आज आरोग्यधिकारी डॉ . सुनील आंबोळे यांच्या पथकाने सदर जसलोक बेकरीमधील नाशवंत माल बाहेर काढून ती बेकरी सील केली. या कारवाईमुळे सांगलीतील बेकरी चालकात खळबळ माजली आहे. सदरची कारवाई आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशाने करण्यात आली.

Leave a Comment