गंगाखेड मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील आरोपींना काही तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

गंगाखेड येथे बुधवारी झालेल्या चोरी प्रकरणांमध्ये फिर्याद दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिस तपास चक्रे फिरवत, औरंगाबाद व जालना येथील पोलिसांची मदत घेत चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

बुधवार दि. १९फेब्रुवारी रोजी गंगाखेड शहरांमधील व्यापारपेठेत असणाऱ्या कृष्णा मोबाइल सेल्स आणि सर्विसेस या मोबाईलच्या दुकानात मोठी चोरी झाल्याचे उघड झाले होते. सदरील दुकान मालकाने यासंदर्भात गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण चे प्रविण मोरे यांनी २० फेब्रुवारी रोजी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अशाप्रकारे चोऱ्या करणारा अकबर उर्फ चोरबा हा सराईत चोर बुरखा घालून चोरी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

दरम्यान पोलीसांनी दुकानातून चोरीस गेलेल्या मोबाईल्सची संपुर्ण माहिती,आयएमईआय नंबर, मोबाईल नंबर हस्तगत केले होते. चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये रिचार्ज करण्यासाठी दुकानात वापरण्यात येणाऱ्या मोबाईलचा देखील समावेश होता. रिचार्ज करण्यासाठी वापरण्यात येणारा याच मोबाईल बाबात तांत्रीक माहिती वापरत आरोपी भोकरदन सिल्लोड रोडवर करंजाळा साबळे, ता.भोकरदन जि.जालना या रोडवर सिल्लोडमार्गे जात असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात आला.

भोकरदन पोलीस पोउपनि बी.एस.ढगारे,पो.स्टे.सिल्लोड शहर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या व्हॉट्सअपवर आरोपी व त्यांच्याकडील संशयीत वाहनाचे फोटो पाठवून भोकरदन ते सिल्लोड रोडवर नाकाबंदी करण्या बाबत विनंती करण्यात आली. दिलेल्या माहितीवरुन पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या नाकाबंदीत संशयीत आरोपी अकबरखान हबीबखान (वय ३० )रा. मालेगाव पोलीस स्टेशन समोर, मालेगाव जि.नाशिक, अफसरखान हबीबखान (वय २६ ), रा. क्रांती नगर, महात्मा फुले हायस्कुल जवळ, परभणी, सय्यद हुसैन सय्यद हबीब (वय २१ ) रा.शब्बीर नगर, मालेगाव जि.नाशिक हे वाहन क्रमांक एम.एच.०४ एफ.ए. ८१४६ मध्ये सिल्लोडकडून मालेगावकडे जातांना सिल्लोड ते भोकरदन रोडवरील एकता पेट्रोल पंपासमोर सापडले.

आरोपीकडील वाहनामध्ये पोलीस ठाणे गंगाखेड येथील चोरीस गेलेले मोबाईल, लॅपटॉप, चेक, रोख रक्कम असा एकूण २५ लाख ५५ हजार ६६५ रुपयांचा ऐवज ज्यात आरोपींच्या कारच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपासासाठी आरोपींना गंगाखेड पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आले असून आरोपीकडून रियलमीश , ओपो , व्हीओ, सॅमसंग, आयटेल, अशा विविध कंपन्यांची चोरलेले मोबाईल व एक एचपी कंपनीचा जुना लॅपटॉप, एक महिंद्रा एक्सयुव्ही चाचाकी वाहन क्रमांकएम.एच.०४ एफ.ए.८१४६ जप्त करण्यात आली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment