तीला १०दिवसांत न्याय मिळाल्याचा आनंद; निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टिम, HELLO महाराष्ट्र । संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या हैद्राबाद निर्भया प्रकरणात तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी चकमकीत ठार झाले आहेत. या घटनेनंतर सर्वस्थरांतून हैद्राबाद पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच दिल्लीतील निर्भया प्रकरणामधील पीडितेच्या आईनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हैद्राबादच्या  पीडितेला १० दिवसांत न्याय मिळाला याचा आनंद झाला. तसेच आरोपींचा एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप धन्यवाद, असे निर्भयाच्या आई आशादेवी यांनी म्हटले आहे.

आशादेवी म्हणाल्या की, पोलिसांच्या या कारवाईमुळे मला खूपच आनंद झाला आहे. पोलिसांनी खूपच चांगले काम केले आहे. यानंतर आता ही कारवाई करणाऱ्या पोलिसांवर प्रशासनाने कुठलीही कारवाई करु नये, अशी मागणीही त्‍यांच्‍याकडून करण्‍यात आली आहे.

दरम्यान शुक्रवारी पहाटे हैद्राबाद प्रकरणातील आरोपीना घटनास्थळी घेऊन जात असताना त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत हे चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनेच्‍या चार दिवसात पोलिसांकडून आरोपींचा खात्‍मा करण्‍यात आला असल्याने. सोशल मीडियावर निर्भयाला न्‍याय मिळाला अशीच भावना सर्वंजण व्‍यक्‍त करत आहेत.

Leave a Comment