मिरजेत आयपीएस अधिकारी संदीप गिल यांची धडाकेबाज कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मटका अड्ड्यावर टाकला छापा : ४ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल केला जप्त.

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

मिरजेतील आदर्श कॉलनी पंढरपुररोड राहणारा शिराज दादापीर कोतवाल हा त्याच्या राहत्या घरात बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बेकायदा मोबाईलवरून बेकायदा मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गिल यांच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना अटक केली असून रोख २ लाख ९४ हजार रूपये तसेच १३ मोबाईल, चार मोटरसायकली, जुगाराच्या चिठ्ठ्या असा एकूण ४ लाख ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार मिरज-पंढरपूररोडवर आदर्श कॉलनी येथे राहणारा शिराज कोतवाल हा मोबाईलवर बेकायदा मटका घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंह गिल यांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून शिराज दादापीर कोतवाल यांच्या बंगल्याच्या दुसर्‍या मजल्यावर छापा टाकला.
मोबाईल फोनवर लोकांचेकडून पैसे घेऊन कल्याण व मुंबई मटका नावाचा जुगाराचा खेळ घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी शिराज दादापिर कोतवाल तसेच एजंट सलीम शेख, फिरोज मुलाणी, अनिल परदेशी, फिरोज अत्तार, सदानंद खेडकर, समीर मुतवल्ली, गणेश हेरवाडे यांना अटक केली आहे. हे सर्वजण लोकांचे कडून मोबाईल फोनवरुन आकडे घेवून त्याची प्रिंटरवर प्रिंट काढून बेकायदा कल्याण व मुंबई मटका जुगाराचे अकड्यावर लोकांकडून पैसे घेऊन जुगाराचा खेळ खेळत होते. मिरजेतील अवैध धंदेवाल्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

शिराज कोतवाल व त्याचे वरील ७ सहकारी एजंट यांचे विरुध्द मिहाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी (आयपीएस) संदीप सिंह गिल यांनी मटका अड्ड्यावर मोठी कारवाई केल्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या उरात धडकी भरली आहे. शहराती कुठेही अवैध धंदे चालू देणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment