आयटीपीबी जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, ६ जवानांचा मृत्यु तर २ जण गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। छत्तीसगडमधील नारायणपुर जिल्हयामध्ये इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानांमध्ये झालेल्या वादविवादात जवानाने च आपल्या इतर सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये सहा जवानाचा मृत्यु झाला असून दोन जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.

जखमींना हेलिकॉप्टरच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सुट्टी न मिळाल्यानं त्यानं हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमींना हेलिकॉप्टर द्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Leave a Comment