बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मुर्त्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

दिंङोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मुर्त्यू झाला असून वनविभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची बालिका मयत झाल्याची घटना आज दिं. १४ रोजी सायंकाळच्या सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.
परमोरी शिवारातील वरखेडा रोड वरील मॅकडॉल कंपनी लगत असलेल्या वस्ती नजीक शेतात काम करीत असतांना आई सोबत पाठीमागे असलेली तीन वर्षीय गायञी प्रकाश गांगोडे हीच्या वर बिबट्यांने अचानकपणे हल्ला करून उसाच्या शेतात फरफटत नेत हल्ला करून ठार केले.

दिंडोरी वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी आरोप करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात बालकांचा मुर्त्यू झाला असल्याची ही चौथी घटना घडली आहे. तर हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची चार दिवसापूर्वीच मातेरेवाडी येथे घटना घडली होती.

Leave a Comment