बाल्कनीत बराच वेळ फोनवर बोलत होती ‘ती’, पुढं असं काही घडलं…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । मध्य प्रदेशात एक हृदयद्रावक घटना घडली. बाल्कनीत फोनवर बोलत असताना अचानक पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरातील कोलार परिसरात ही दुर्घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीत ती रेलिंगवर बसून फोनवर बोलत होती. त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. तिच्या रूममेट्सने तिला तात्काळ रुग्णालयात नेले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दीक्षा बिसेन असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची बालाघाटची रहिवासी होती. नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षात ती शिकत होती. कोलारच्या ललिता नगरमध्ये ती भाड्याने राहत होती. तिच्यासोबत दोघी जणी राहत होत्या. रविवारी संध्याकाळी आम्ही घरी परतलो होतो. आमच्यासाठी स्वयंपाक करत होते. दीक्षाला त्यावेळी फोन आला. ती बोलता बोलता खोलीतून बाहेर बाल्कनीत गेली. काही वेळाने मोठा आवाज झाला. बाहेर येऊन पाहिले तर ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली होती. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती सहकारी तरुणींनी दिली.

तरुणी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने मोठा आवाज झाला. तो ऐकून तिच्या फ्लॅटमधील सहकारी तरुणी धावत आल्या. दोघीही त्यावेळी जेवण करत होत्या. त्यांनी तिला उचलून रुग्णालयात नेले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. कोलार पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी बाल्कनीतील रेलिंगवर बसून मोबाइलवरून बोलत होती. घटनेच्या काही दिवस आधी तिच्या सहकाऱ्यांनी तिला असे करण्यापासून रोखले होते. तसेच तिच्या पालकांकडेही तक्रार केली होती. मात्र, ही बाब तरुणीने गांभीर्याने घेतली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

Leave a Comment