अनर्थ टळला ! मंगळुरु विमानतळावर सापडलेली स्फोटकं केली निकामी; पहा व्हिडिओ

टीम हॅलो महाराष्ट्र । आज दुपारी कर्नाटकातील मंगळुरु विमानतळाच्या तिकिट काउंटरजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग सापडल्याने एकच असून खळबळ उडाली. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपूर्ण विमानतळ परिसर सीआयएसएफच्या जवानांनी खाली केला. बॅगची तपासणी केली असता त्यात आयईडीसारखे स्फोटकं असल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती सीआयएसएफचे डीआयजी अनिल पांडे यांनी दिली.

दरम्यान, घटनास्थळी बॉम्ब नाशक पथक पाचारण करत पोलिसांनी तपास सुरु केला असल्याची माहिती मंगळुरुचे पोलीस आयुक्त डॉ. पी. एस. हर्षा यांनी सांगितली. अखेर ही स्फोटकं मोकळया निर्जनस्थळी नेऊन निकामी करण्यात आला. त्यामुळं एक मोठा अनर्थ सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळं टाळला.

पहा व्हिडिओ-

 

ताज्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

साईबाबा जन्मस्थानाचा शोध मुंबईकराने लावला; वाचा स्पेशल रिपोर्ट

तुमचे आधारकार्ड हरवलंय? काळजी करू नका; 15 दिवसात घरपोच मिळेल, जाणून घ्या प्रक्रिया

Amazon घेऊन येत आहे पर्यावरणपूरक ई रिक्षा; संस्थापक जेफ बेझोस यांनी ट्विटरवरून दिली

माहितीवर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com