खळबळजनक! आईला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच तिच्या २३ वर्षीय मुलाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । आईला कोरोना विषाणूची लागण झाली म्हणून तिच्या २३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे घडली. आईला बघून आल्यावर नैराश्येपोटी घरात मुलाने गळफास शुक्रवारी मध्यरात्री घेतल्याचे सांगण्यात आले. झी २४ तास वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

आईला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मुलगा नैराशात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर मुलाने नैराश्येपोटी घरात गळफास घेऊन जीवन संपवले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, ठाणे, मुंबईनंतर नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ७३९ वर पोहोचली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांमुळे नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वैद्यकीय तज्ज्ञांसमवेत नाशिकचा दौरा करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment