लिकर किंग अतुल मदन प्रकरणात मोठा खुलासा; अवैध दारूसाठा विखे-पाटलांच्या कारखान्यातून आल्याचा संशय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । सध्या फरार असलेला नाशिकचा लिकर किंग अतुल मदन प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केला होता. हा मद्यसाठा लिकर किंग अतुल मदनच्या वाईन शॉपमध्ये जात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अतुल मदन याचे नाशिकमधील 14 वाईन शॉप सील करण्यात आले होते. हा मद्यसाठा विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातून आल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या संशयानुसार आता विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्यातील दारुचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला दारु साठा आणि विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यातील दारुचे नमुने यात साधर्म्य आढळल्यास उत्पादन शुल्क विभाग विखे पाटील कारखान्याच्या मालकांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे भाजपचे मोठे नेते गिरीश महाजन यांचं नाव नाशिकच्या बीएचआर घोटाळ्यात आलं आहे. तर आता अवैध मद्यसाठा प्रकरणी विखे पाटील यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे भाजपचे दोन मोठे नेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक हद्दीत पशू खाद्याच्या ट्रकमधून जाणारा अवैध मद्यसाठा पकडला होता. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा हा मद्यसाठा शहरातील एकाच दारु दुकान मालकाच्या दुकानांमध्ये जात होता. नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईने अवैध मद्यविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन लिकर किंग अतुल मदनच्या मालकीच्या 14 दारु दुकानांना सील करत धडक कारवाई केली होती. एकीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई केलेली असताना, उत्पादन शुल्क विभाग अतुल मदन यांच्याकडून खुलासा आल्यानंतर अटक करु, अशा डिफेनसिव्ह मोडमध्ये का आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

Leave a Comment