सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी; मोस्ट वॉन्टेड चोरांना सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले

नाशिक । सुट्टीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीच्या मदतीने धडाकेबाज कामगिरी केली आहे. या दाम्पत्याने दोन मोस्ट वॉन्टेड नाशिकच्या सोनसाखळी चोरांना चोरांना पकडून त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलीस पत्नीने देखील धाडस दाखवून आपल्या पोलीस पतीसह या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांना पकडून ठेवलं. क्राईम ब्रांचचे पोलीस कर्मचारी गुलाब सोनार आणि त्यांच्या पत्नी ज्योती सोनार यांच्या या धाडसाचं संपूर्ण शहरात कौतुक होतं आहे. (Nashik Police Couple arrest most wanted theft)

Nashik - Police Naik Gulab Sonar arrested chain snatchers while on leave

गुलाब सोनार हे नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 2 मध्ये काम करतात. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहेत. या दाम्पत्याने सिनेस्टाईल पाठलाग करुन दोन सोनसाखळी चोरांना पकडलं. आपलं घरगुती काम आटपून हे दोघेजण संगमनेरवरून नाशिककडे येत होते. त्याचवेळी रस्त्यात त्या दोघांना दोन जण बाईकवर जाताना दिसले.

गुलाब सोनार यांना त्यांचा चेहरा पाहताच क्राईम ब्राँचच्या डायरीत या चोरांना बघितल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ आपल्या पत्नीला तयार राहण्याची सूचना केली. त्यांनी संगमनेरपासून पाठलाग केल्यानंतर अखेर नाशिकजवळ आले. त्यावेळी त्यांनी सापळा रचून त्या चोरांना पकडलं.पोलीस कर्मचारी गुलाब सोनार यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने या चोरांना पकडून ठेवलं. त्यानंतर हुशारीने आरडाओरड करत लोकांना जमा केले. विशेष म्हणजे या आरोपींकडे धारदार शस्त्रास्त्र असताना देखील ज्योती सोनार यांनी धाडसाने त्यांना पकडून ठेवलं.

सोनार दाम्पत्याने पकडलेले हे चोर गेल्या काही वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड आरोपी होते. राजू उर्फ राजाराम खेटू राठोड (हडपसर) आणि नागेश बडवर (बेळगाव) अशी या दोघा आरोपींची नावं आहे. त्यांनी आतापर्यंत मुंबई, सोलापूर, पुणे, सातारा या भागात सोनसाखळी चोरी केली आहे. सोनार दाम्पत्याने जिवाची पर्वा न करता दाखवलेलं धाडस हे कौतुकास्पद आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com