निर्भयाच्या गुन्हेगारानं जीव वाचवण्यासाठी केली शेवटची याचिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । निर्भया प्रकरणातील एका गुन्हेगारान आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केलीये. या प्रकरणातील चारही दोषींची फाशी कायम ठेवण्याचा निकाल दिल्ली न्यायालयाने दिला होता. या निकालावरून २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असं न्यायालयाने म्हटलं होतं.

तसेच, या गुन्हेगारांना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी न्यायालयानं दिला होता. त्यामुळे यातील एका गुन्हेगारानं जीव वाचवण्यासाठी शेवटची याचिका दाखल केली आहे. या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केलीये. यामध्ये या आरोपीने २२ जानेवारी रोजी देण्यात येणारी फाशी थांबवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment