पाचगणीत शॉपिंग सेंटरच्या भाडेपट्टा मालमत्तेत शर्तभंग; ‘पुरोहीत नमस्ते’वर मुख्याअधिकारी कारवाई करणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पाचगणीसारख्या इंग्रजांनी शोधलेल्या शहरांमध्ये बहुतांशी मालमत्ता या भाडेपट्ट्यावर आहेत. पाचगणी नगरपालिकेच्या मालकीत असलेल्या ‘पुरोहीत नमस्ते’ या गाळ्याच्या भाडेपट्टा धारकाने अनधिकृतपणे किचन व गाळ्याच्या आतील बाजूस डागडुजीच्या नावाखाली अंतर्गत बांधकाम केले आहे. हा एकूण कराराचा शर्तभंग असल्याचं मानलं जात आहे.

पाचगणीचे नवीन मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर हे भाडेपट्टाधारक मालकावर कारवाई करणार का ? असा प्रश्न आता सर्वसामान्य पाचगणी करांकडून व्यक्त होत आहे. पाचगणीतील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये फायनल प्लाॅट नंबर १८० व फायनल प्लाॅट नंबर १८२ या भाडेपट्टा भूखंडावर पाचगणी नगरपालिकेने १९८८ साली वाणिज्य कारणास्तव वाणिज्य संकुल मंजूर करुन घेतले आहे. या वाणिज्य संकुलातील दुकान गाळ्याची लांबी आणि रुंदी ठरवून देण्यात आली आहे. पुणे आणि साताऱ्याच्या नगररचना विभागाने इथे परवानगी देताना गाळ्यामध्ये कोणताही बदल करु नये अशा अटीवर परवानगी दिली आहे.

मात्र पाचगणीत भाडेपट्टा संकुलातील भाडेकरुच मालक झाले आहेत. या ठिकाणी प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने राजकीय दबाव व नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरण्याचं काम याठिकाणच्या शॉपिंग सेंटरमध्ये सुरु आहे. नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून शॉपिंग सेंटरच्या भाडेपट्टा मालमत्तेवरुन सुरु असलेल्या नियमबाह्य बांधकामावर मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Comment