परभणीत पोलीस स्थापना दिवसानिमित्त काढलेल्या मार्चमधून पोलिसांनी केलं शक्तिप्रदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

पोलीस स्थापना दिवस म्हणजेच रेजिंग डे च्या निमित्ताने बुधवारी परभणी शहरातून, पोलीस दलाने भव्य असा पोलीस मार्च काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले. शहरातील शनिवार बाजार पासून सुरू झालेला हा मार्च मुख्य बाजारपेठेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी आपल्या लवाजम्यासह, शहरातून मार्च काढला.

यामार्चमधून पोलीस दलाने शक्तीप्रदर्शन केले. जिल्ह्यात मागील काही काळामध्ये झालेलया हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने काढलेल्या या मार्चला वेगळे महत्व आहे. मार्चच्या सुरवातीला, विविध शाळातील विद्यार्थ्यांनी, हातामध्ये फलक घेऊन सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ वाहतूक शाखा, पोलीस दल, एस आर पी, यांच्यासह पोलिसांच्या वाहनांचा मोठा ताफा देखील सहभागी झाला होता. यातून पोलिसांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी देखील आवाहन केले.

Leave a Comment