बस स्थानाकातून महिलेची पर्स लंपास, १७ तोळे दागिने चोरीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून कोल्हापूर येथील महिलेचे रोख रक्कम आणि दागिने यांची पर्स लंपास केल्याची घटना आज घडली. सांगलीमध्ये नातेवाईकांच्या धार्मिक कार्यासाठी संबंधित महिला आल्या असता चोरट्यांनी हात साफ केला. कालच आमराई येथे महिलेच्या गाडीची डिकी फोडून रोख रक्कम व सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आज भर दिवसा बसस्थानकातून 17 तोळे दागिने रोख रक्कम असा एकूण पावणे पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.  
सांगली बस स्थानकावर गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने १७ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्से चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या लक्ष्मी विष्णू मोरे या सांगलीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे एका धार्मिक कार्यक्रमासाठी पती, मुलगा आणि सुनेसमवेत आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या आपल्या गावी परत चालल्या होत्या. बस स्थानकावर असणाऱ्या गर्दीचा फायदा उचलत चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्से हातोहात लांबवली. बस मध्ये बसल्यानंतर आपली पर्से चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर सौ.मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
या घटनेची पोलिसात नोंद झाली असून पोलिसानी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. मात्र रोज महिलांना लुटण्याचा घटना दिवसा होत असल्याने महिलांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment