सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जत तालुक्यातील राजोबाचीवाडी येथील २१ वर्षीय किरण उर्फ केराप्पा ढेमरे या तरुणास जत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने पोक्सो, बलात्कार, अट्रासिटीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. गुडडापूर येथील केराप्पा ढेमरे याची फेसबुकवरून शेगाव येथील अल्पवयीन मुलीची ओळख झाली.

फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर केराप्पा याने मुलीचा मोबाईल नंबर घेतला व त्यावर तो मॅसेज करू लागला. या ओळखीतून त्याने भेट झाल्यानंतर मुलीसोबत फोटो काढले. काढलेले फोटो इतरांना दाखवीन तसेच जिवे मारेन अशी धमकी देत त्याने मुलीवर बलात्कार केला तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी पिडित मुलीने तक्रार दिल्यानंतर केराप्पा ढेमरे याच्यावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास सापळा रचुन अटक केली. न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीकारी दीपक जगदाळे करत आहेत. या आरोपी वर एका माजी सैनिकांची बंदुक व काडतुस चोरल्याचा व शेती पंपाची मोटर चोरल्याचा जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Leave a Comment