अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ ट्रकचा अपघात, मुंबईतील तीन जण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास अक्कलकोट जवळ स्कोर्पओ आणि ट्रक यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये स्कोर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे तर गाडीतील तीन जण जागीच ठार झाले आहेत.

दरम्यान अपघातातील मृतांची माहिती अद्याप समोर आलेली नसून अपघातग्रस्त गाडी मुंबईची असल्याचे समजत आहे.

Leave a Comment