छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षलवादी तळ उध्वस्त; १२ नक्षलींना जिवंत पकडण्यात यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । छत्तीसगडमधील बस्तर आणि दंतेवाडा भागात सुरक्षा दलाने धडक मोहीम राबवली आहे. या ठिकाणी असलेले नक्षलवाद्यांचे तळ उध्वस्त करत १२ नक्षलींना ताब्यात घेण्यात लष्कराच्या तुकडीला यश आलं आहे.

पोलीसांना किलेपाल आणि मुंडानार गावानजीकच्या जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डीआरजीच्या जवानांनी कटेकल्याण आणि पखनार गावाच्या मध्यात असलेल्या जंगलातील नक्षलवाद्यांच्या ठिकाणास घेरले.

जवानांच्या कारवाईची चाहुल लागताच नक्षलवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. ज्याला जवानांकडून सडेतोड प्रतित्युत्तर देण्यता आले. साधारण अर्धातास चाललेल्या चकमकीनंतर जवानांनी १२ नक्षलवाद्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. यासोबतच काही घातक स्फोटकेही यावेळी जप्त करण्यात आली आहेत.

या चकमकीत डीआरजीचा एक जवान जखमी झाला असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

 

 

Leave a Comment