सी.सी.डि या नामांकित कॉफी कॅफेचे मालक गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगरुळु | कॉफी कॅफे डेचे मालक व्ही.जी. सिद्धार्थ अचानक गायब झाले आहेत. ते सोमवार पासून गायब झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियात घबराट पसरली आहे. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे जावई आहेत. तसेच कृष्णा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या वृत्ताने खळबळ माजली असून त्यांच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

२९ जुलै रोजी सिद्धार्थ हे बेंगळुरुला येत होते. त्याच दरम्यान संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ते नेत्रावती नदीजवळ उतरले होते. कारमधून उतरले आणि फिरू लागले. मात्र फिरता फिरताच ते बेपत्ता झाले. सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली आहे.

दरम्यान कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा ही देखील एस.एम.कृष्णा यांच्या निवासस्थळी येऊन त्यांना भेटले आहेत. एस.एम.कृष्णा हे भाजपचे नेते आहेत. ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी काँग्रेस पक्षात होणाऱ्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून २०१७ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Leave a Comment