प्रेम प्रकरणातून १२ वीला शिकत असलेल्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
प्रेम प्रकरणातून १२ वी मध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणीला गार्डनमध्ये नेऊन तरुणाने तिच्या पोटात चाकू मारुन तिच्या हत्या केली आहे. यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू मारल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात घडली आहे. तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असुन तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्रणिता कोंबे असे प्रेम प्रकरणातून हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रणिता ही जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगाव मधील सेफला हायस्कूल मध्ये ईयत्ता १२ वीला शिकत आहे. ही घटना सोमवारी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. शाळेत जात असताना एका तरुणाने येऊन तिच्या पोटात चाकूने सपासप वार केले आणि त्यानंतर तरुणाने स्वताच्या पोटात चाकू मारून स्वतःला संपवन्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनंतर घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत.

Leave a Comment