Saturday, February 4, 2023

पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा : एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

- Advertisement -

कराड | एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे पोलिस दलाची 48 वी कोल्हापूर परिशेत्रिय क्रीडा स्पर्धा 2022 नुकतीच संपली. या स्पर्धेत सहभागी असलेला कोल्हापूर पोलीस दलातील स्पोर्ट्समन संशयित आरोपी महेश मगदूम हा आहे. तो कबड्डीपटू आहे. त्याची प्रो कबड्डी लीगमध्ये देखील त्याची निवड झालेली होती. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली आहे.

- Advertisement -

साताऱ्यात सुरू असलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. पोलिसानेच केलेल्या संतापजनक कृत्यामुळे क्रीडा स्पर्धेला देखील गालबोट लागले आहे. हा गुन्हा बोरगाव हद्दीत घडल्यामुळे तपासासाठी बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सातारा ते कराड या प्रवासा दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर मुलीने आपल्या आई- वडिलांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली.