अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ!! लोकसभेच्या निकालापूर्वीच उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

0
1
AJIt Pawar Group
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ही मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर या मतदानाचा निकाल जाहीर होईल. त्यामुळे सर्वांचेच लक्ष चार जूनच्या तारखेकडे लागले आहे. तर दुसऱ्या बाजूला निकालाची तारीख आणि वेळ जवळ आल्यामुळे राजकीय हालचालींचा वेग ही वाढला आहे. मात्र अशातच अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) महिला उमेदवाराच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या महिला उमेदवाराच्या विरोधात थेट गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला नेत्या आणि लोकसभा उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी परवानगी नसतानाही आचारसंहितेचे उल्लंघन करत रॅली काढून जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे अर्चना पाटील आणि त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लातुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीचा निकाल आला असताना अर्चना पाटील अडचणीत सापडल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अर्चना पाटील यांनी भव्य रॅली काढली होती. या रॅलीला पोलिसांकडून ही परवानगी मिळाली होती. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य सभा झाली. या सभेसाठी कोणतीही परवानगी काढण्यात आली नव्हती. त्यामुळे अखेर तब्बल 43 दिवसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, परवानगी न घेतलेल्या या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे बडे नेते उपस्थित होते.