Crop Insurance | सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वाची आणि फायद्याची योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना. (Crop Insurance) या योजनेअंतर्गत जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले, तर त्याची आर्थिक भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांना मिळत असते. अशातच आता खरीप हंगाम 2024 च्या पीक विमा भरण्याची अंतिम तारीख उलटून गेलेली आहे. 31 जुलै 2024 ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आता 31 जुलै पर्यंत राज्यातून जवळपास 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पिक विमा अर्ज शेतकऱ्यांकडून दाखल झालेले आहे. या पिक विमासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरायचा आहे. त्यामुळे त्यांचे पीक विमा संरक्षण केले जाते. याची माहिती देखील राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.
31 जुलै पर्यंत केलेली मुदतवाढ | Crop Insurance
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै ही ठेवण्यात आलेली होती. परंतु अनेक तांत्रिक अडचणी आले आणि शेतकऱ्यांना पिक विमा भरता आला नाही. यामुळेच कृषीमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना विनंती करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्याची मुदत वाढ 31 जुलै पर्यंत करण्यात आलेली होती. 15 जुलै पर्यंत महाराष्ट्रातील 21 लाख 90 हजार अर्जांची दाखल झालेले होते. परंतु आता अनेक शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला आहे. जवळपास राज्यातील 97% खरीप हंगामातील पेरणी देखील पूर्ण झालेली आहे.
मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये पिक विमासाठी शेतकऱ्यांचे राज्यातून जवळपास 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर या संपूर्ण हंगामा शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास 7280 कोटी रुपये मंजूर झाले होते. आणि त्यातील 4271 कोटी रुपयांचे वाटप देखील करण्यात आलेले होते.