हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Crop Insurance Scheme । खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्याची तारीख १ ऑगस्ट रोजी निघालेल्या शासनाच्या आदेशानुसार वाढवण्यात आली आहे. आता शेतकरी १४ ऑगस्ट पर्यंत खरीप पिकविम्यासाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही अर्ज भरलेला नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पीकविमा योजनेला शेतकऱ्याचा प्रतिसाद खूपच कमी बघायला मिळाला आहे. पोर्टल सेवा, आधार व सीएससी मधील व्यत्ययामुळे शेतकऱ्यांना वेळेत सहभागी होता आलं नाही. त्यामुळे आता अर्जाची मुदत सरकार कडून वाढवण्यात आली आहे.
खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) सहभागी होण्याची अंतिम मुदत यापूर्वी ३१ जुलै २०२५ होती. मात्र शेतकऱ्यांकडून सहभाग अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे, तसेच अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकाचा अभाव, पिक विमा योजना पोर्टलवरील अडथळे, आधार व सेवा केंद्रांच्या तांत्रिक अडचणी, तसेच राज्यातील भूमी अभिलेख प्रणालीतील व्यत्यय यामुळे अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने १ ऑगस्ट रोजी दिलेल्या सूचनेनुसार योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आता १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे.
यंदा शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद कशामुळे? Crop Insurance Scheme
सरकारने २०२२ पासून राबविलेल्या पीक विमा योजनेत बदल करत सुधारित पीक विमा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादनावर आधारित आणि ८०:११० या मॉडेलचा अवलंब करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून दिल्या होत्या. या योजनेची (Crop Insurance Scheme) अंतिम मुदत ही ३१ जुलै होती… मात्र शेतकऱ्यांचा यंदा थंडा प्रतीसाद बघायला मिळाला. महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला अवघ्या १ रुपयांत पीक विमा भरला जात होता.. परंतु आता शेतकऱ्याला जास्तीची रक्कम भरावी लागतेय, त्यामुळॆ शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. म्हणूनच आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची वेळ सरकारवर आली.
कसा करायचा अर्ज?
पीक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi हे App डाउनलोड करा.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर प्रोसेस पूर्ण करा.
अँप ओपन होताच तुम्हाला सरकारी योजना हा पर्याय दिसेल.
त्यातील पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) वर क्लिक करा.
आता तुम्ही आवश्यक कागदपत्रे सादर करून थेट अर्ज करू शकता.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे कृषि अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.