Crop Loan Stamp Duty | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! सरकारने 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क केले माफ

Crop Loan Stamp Duty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crop Loan Stamp Duty | आपले सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन निर्णय घेत असतात. अशातच आता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्र सरकारने 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. याआधी नवीन पीक कर्ज घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. परंतु आता हे शुल्क देखील माफ केलेले आहे. 1 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेल्या सर्व नवीन पीक कर्जांनाही हा नियम लागू असणार आहे.

सरकारने (Crop Loan Stamp Duty) घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील खूप शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जे शेतकरी कृषी गरजांसाठी लहान कर्ज घेतात. त्यांना देखील फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टींचा लाभ मिळण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत असतात. आणि हा निर्णय देखील त्यातीलच एक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

सरकारने खते आणि बी- बियाण्यांवर सबसिडी देणे. यांसारख्या मदत करण्यासाठी अनेक उपाययोजना देखील केलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार वारंवार पावले उचलत आहे. पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करणे. हे महाराष्ट्र सरकारचे एक मोठे पाऊल आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. आणि त्यांचे आर्थिक स्थिती सुद्धा सुधारणार आहे.