इंडियाच्या बैठकीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च; जेवणासह एका रूमसाठी मोजले एवढे रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आणि उद्या मुंबईत (Mumbai) इंडिया आघाडीची (India) तिसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातून 28 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील या बैठकीची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडीने घेतली आहे. या बैठकीचे खास नियोजन आघाडीने केले असून त्यासाठी लाखोंच्यावर पैसे खर्च करण्यात आले आहेत. नुकताच याचा हिशोब मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिला आहे. ज्यामध्ये कोणत्या गोष्टीवर किती खर्च झाला हे सांगण्यात आले आहे.

मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये इंडियाच्या बैठकीसाठी 45 हजारांच्या 65 खुर्च्या मागवण्यात आल्या आहेत. तर जेवणाची एक प्लेट साडेचार हजार रुपयांना ऑर्डर केली आहे. असा एकूण 14 तासांसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च आघाडीने केला आहे. ज्या ठिकाणी इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, त्या हॉटेलच्या एका खोलीचा दर 25 ते 30 हजार रुपये इतका आहे. अशा प्रत्येक नेत्यांसाठी सेपरेट खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. सर्वात जास्त खर्च आघाडीने फक्त नेत्यांच्या जेवणावर केला आहे.

त्यामुळेच या खर्चावरून उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “चौदा ते पंधरा तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च काढण्यात येत होता. ग्रॅण्ड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे. ग्रँड हयातमधील एका खोलीचा दर हा 25 ते 30 हजार रुपये इतका आहे” अशी टीका सामंत यांनी केली आहे.

तसेच, “जी यादी हॉटेलकडे गेली आहे त्यामध्ये शिवसेना हा पक्ष 26 व्या स्थानावर आहे. तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 व्या स्थानी आहे.” असे भाष्य ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या स्थानावर सामंत यांनी केलं आहे. तर, “मुंबईत असंतुष्टांचा मेळावा भरतोय. देशाचं नाव राजकारणासाठी वापरणं हे दुर्दैवी आहे” असे ही त्यानी म्हणले आहे. उदय सामंत यांनी मांडलेल्या या खर्चातून इंडियाच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.