हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Crude oil Reserves। एकीकडे इराण- इस्राईल युद्धामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता असताना दुसरीकडे भारताला एक गुड न्यूज मिळाली आहे. अंदमान समुद्रात कच्च्या तेलाचा आणि वायूचा मोठा साठा सापडला आहे. हा पेट्रोलियम साठा गयानामध्ये अलीकडेच सापडलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्याइतकाच असल्याचे बोललं जातंय. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा मिळणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
भारताला मोठा दिलासा – Crude oil Reserves
आपण आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या ८५ ते ८६ टक्के भाग इतर देशांकडून आयात करतो. भारत सध्या ४२ देशांकडून कच्चे तेल खरेदी करतो,सध्या इराण आणि इस्राईल मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात तेलाच्या किमतीचा फडका उडणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. मात्र याच दरम्यान, अंदमान समुद्रात सापडलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या दाव्यानुसार, अंदमान समुद्रात सापडलेले तेल गयानामध्ये अलीकडेच सापडलेल्या साठ्याइतकेच असल्याचे आहे. अलिकडेच, गयानामध्ये ११.६ अब्ज बॅरल तेल आणि वायू सापडला आहे, जो एका चिनी कंपनीच्या सहकार्याने शोधण्यात आला आहे. या साठ्यानंतर, गयाना कच्च्या तेलाच्या उत्पादनात अव्वल स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की जर हा तेलसाठा (Crude oil Reserves) आमच्या अंदाजानुसार असेल आणि तो काढता आला तर भारताच्या ऊर्जेच्या गरजा एकाच वेळी पूर्ण होतीलच, शिवाय अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. सूर्यमणी नावाच्या विहिरीत ४० लाख टन तेलाची क्षमता असल्याचे आढळून आले. नीलमणी विहिरीत १२ लाख टन तेलाची क्षमता आहे. तर दुसऱ्या विहिरीपासून २,८६५ मीटर खोलीवर तेल आणि वायू दोन्हीचे साठे सापडले. अनेक विहिरींमधून तेल सापडले आहे आणि आता त्याचे मूल्यांकन केले जात असल्याची माहिती हरदीप सिंग पुरी यांनी दिली.




