नवी दिल्ली । बदलत्या काळात, क्रिप्टोकरन्सी फायनान्सच्या जगतात चर्चेचा विषय बनून राहिला आहे. अनेक देश स्वतःची डिजिटल करन्सी आणण्याच्या योजनेवर काम करत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) टप्प्याटप्प्याने सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) आणण्याच्या तयारीत आहे. RBI ने या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या अलीकडील वाढीमुळे जगभरातील वित्तीय संस्थांना डिजिटल करन्सीचा विचार करण्यास भाग पाडले आहे. यामुळेच सेंट्रल बँकेने स्वतःची डिजिटल करन्सी आणण्याचे नियोजन सुरू केले आहे.
डिसेंबर 2021 पर्यंत डिजिटल करन्सी चाचणी योजना
CBDC (central bank digital currency) ची सुरुवात भारतासाठी ऐतिहासिक ठरेल. RBI सारख्या सेंट्रल बँकेचे लक्ष हे मूलभूतपणे पारंपारिक बँक म्हणून काम करण्याऐवजी देशातील बँकिंग सिस्टीमना सपोर्ट देणे आहे.
सीएनबीसीशी झालेल्या संभाषणात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की,” डिसेंबर 2021 पर्यंत डिजिटल करन्सी संदर्भातील चाचणी कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो. जर ही चाचणी यशस्वी झाली तर डिजिटल करन्सी मोठ्या प्रमाणावर सुरू होईल.
डिजिटल करन्सी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काय फरक आहे?
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे मुळात डिजिटल किंवा व्हर्चुअल करन्सी आहे, जी केंद्रीय बँकेकडून टेंडरच्या स्वरूपात जारी केली जाईल. हे विद्यमान डिजिटल आणि फियाट करन्सी सारखेच काम करते. विशेष म्हणजे ही कायदेशीर मान्यताप्राप्त करन्सी आहे. या डिजिटल करन्सीला देशाच्या सरकारने मान्यता दिली आहे ज्याला सेंट्रल बँक जारी करते.
डिजिटल करन्सी कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून मित्राच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता किंवा तुमच्या फोनवर पेमेंट App वापरता. जर तुम्ही हे पैसे ATM मधून काढले तर ते कॅश मध्ये रुपांतरित होते.
त्याच वेळी, बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीला कोणताही फिझिकल फॉर्म नाही. आपण या करन्सीला स्पर्शही करू शकत नाही. हे डीसेंट्रलाइज्ड आहे जे सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. क्रिप्टोकरन्सी डिजिटल वॉलेटमध्ये ठेवली जाते. डिजिटल करन्सीचे मूल्य क्रिप्टोकरन्सीसारखे बदलत नाही.