हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CSIR Recruitment 2025 – CSIR केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत (Central Road Research Institute) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती ‘ज्युनिअर स्टेनोग्राफर, ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट’ पदासाठी घेतली जाणार असून , यातून एकूण 209 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 दिलेली आहे. तर चला या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (CSIR Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘ज्युनिअर स्टेनोग्राफर, ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 209 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदानुसार विभागणी –
ज्युनिअर स्टेनोग्राफर – 32
ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट – 177
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी या पदासाठी 28 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज शुल्क –
अनारक्षित (यूआर), ओबीसी (एनसीएल) आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी – 500 /-
महिला/अनुसूचित जाती/जमाती/अपंगत्व/माजी सैनिक उमेदवारांसाठी- शुल्क नाही
वेतन –
ज्युनिअर स्टेनोग्राफर – Pay Level 4 (रु 25500 – रु 81100)
ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट – Pay Level 2 (रु 19900 – रु 63200)
अर्ज पद्धती – ऑनलाईन (CSIR Recruitment 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2025
असा करा अर्ज –
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.
महत्वाच्या लिंक्स (CSIR Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.