Cultivation of moringa | चांगल्या उत्पन्नासाठी करा शेवग्याच्या ‘या’ वाणाची लागवड, वर्षभरात होईल भरघोस कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Cultivation of moringa शेवगा या पिकाची महाराष्ट्रात त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेवग्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे बाजारात देखील शेवग्याला जास्त प्रमाणात मागणी असते. शेवग्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरत आहे. यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होणार आहे. आजकाल बाजारामध्ये शेवग्याचा पाला देखील विकला जातो. शेवग्याच्या पाल्यापासून आता पावडर बनवली जाते. आणि या पावडरची देखील बाजारामध्ये खूप चांगल्या दराने विक्री होत आहे. म्हणजेच शेवग्याची शेती ही तुम्हाला दुहेरी उत्पन्न देईल.

त्यामुळे शेतकऱ्यांनी जर शेवग्याच्या (Cultivation of moringa) पिकाचे उत्पन्न घेतले, तर त्यातून त्यांना खूप चांगला फायदा होईल. परंतु आता तुम्हाला या पिकाच्या सुधारित वाणांची लागवड करणे. खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या शेतात शेवगा पिकाची लागवड करण्याचे प्लॅन करत असाल, तर तुम्हाला शेवग्याच्या जातीची सुधारित जातीची लागवड करावी लागेल. नाहीतर तुमचे आर्थिक नुकसान होईल. आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या एका सुधारित जातीची माहिती सांगणार आहोत. ही जात अलीकडेच विकसित झालेली आहे. ज्याचा शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होत आहे.

शेवग्याची पिकेएम – 1 जात | Cultivation of moringa

पीकेएम -1 ही शेवग्याची नव्याने विकसित झालेली एक सुधारित जात आहे. या जातीची लागवड अनेक राज्यांमध्ये केली जाते. शेवग्याच्या या जातीचा सुधारित प्रकार तमिळनाडू येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या पेरियाकुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केले आहे. या जातीची लागवड केल्यानंतर सहा महिन्याच्या काळातच या पिकाला फळ येतात. या जातीच्या शेवग्याची शेंगेची लांबी ही 40 ते 50 मीटर लांब एवढी असते. महाराष्ट्रातील हवामानात देखील या पिकाची आपण लागवड करू शकतो. या जातीची लागवड केल्यावर तुम्ही वर्षभरात 30 किलो शेंगांचे उत्पादन घेऊ शकता.

या जातीच्या झाडापासून 650 ते 850 यादरम्यान शेवगाच्या शेंगाचे उत्पादन होते त्यामुळे शेतकऱ्यांना या जातीची लागवड फायदेशीर ठरणार आहे. परंतु शेतकऱ्यांना जमिनीचा प्रकार त्याचप्रमाणे स्थानिक हवामान या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे नुकसान देखील होऊ शकते यासाठी तुम्ही कृषी तज्ञांचा देखील सल्ला घेऊ शकता.