मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण!! या 2 जिल्ह्यात संचारबंदी लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज बीड,  धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर बीड आणि धाराशिव जिल्हयातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुख्य म्हणजे, या सर्व प्रकारामुळे खाजगी आणि सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी

30 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच सोमवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आक्रमकची भूमिका घेतली. ज्यामुळे गाड्या फोडणे, आग लावणे, हल्ले करणे, जाळपोळ करणे, दगडफेक करणे असे सर्व प्रकार घडले. या जाळपोळीनंतर खबरदारी म्हणून सोमवारपासून बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, बीड जिल्ह्याची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

3 हजार बस फेऱ्या रद्द

तर दुसऱ्या बाजुला धाराशिवमध्ये देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री हिंगोलीत भाजपचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर, धाराशिव येथील तुरोरी गावाजवळ बस पेटवून देण्यात आली. सोलापूरमध्ये ही पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव बस पेटवून देण्यात आली. यानंतर मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात दुसरी बस आंदोलकांनी पेटवून दिली. या सर्व घटनांमुळे धाराशिवमध्ये देखील संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, या पार्श्वभूमीवर बीड, धाराशिव, जालना व इतर जिल्ह्यांतील जवळपास 3 हजार बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे शांततेत आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. तसेच, राज्यात होणाऱ्या जाळपोळीला सरकार जबाबदार असल्याचे टीका जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांनी जाळपोळ करू नका, नेत्यांच्या घरी जाऊ नका, आपल्याला आंदोलन शांततेत करायचे आहे, असे आवाहन देखील सर्वांना केले आहे.