Curry Tree Tips For Growth | तुमच्याही कढीपत्याच्या झाडाची वाढ होत नाही का? या टिप्स करा फॉलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Curry Tree Tips For Growth | भारतीय स्वयंपाकात स्वयंपाक करताना अनेक पदार्थांना जास्त महत्त्व असते. त्यातीलच एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कढीपत्ता. पदार्थाची चव आणखी वाढवण्यासाठी हा कडीपत्ता वापरतात. तसेच या कडीपत्त्याचे आरोग्यासाठी देखील खूप फायदे आहेत. अनेकजण त्यांच्या बागेमध्येच कढीपत्त्याची रोपे लावतात. परंतु अनेकवेळा आपण असे पाहतो की कढीपत्त्याच्या या झाडाची चांगली वाढ होत नाही.

अनेकवेळा कढीपत्ता नुसता काडीसारखा वाढतो आणि त्याच्या पानांना मात्र पत्ताच नसतो. असे तुमच्याही बाबत अनेक वेळा झालेले असेल. परंतु जर तुमचे कडीपत्त्याचे झाड जगत नसेल किंवा त्याला पाने येत नसतील, तर आम्ही आज काही अशा टिप्स (Curry Tree Tips For Growth) सांगणार आहोत. त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या कढीपत्त्याचे झाड जोमाने वाढेल.

कढीपत्त्याच्या रोपाची काळजी कशी घ्यावी | Curry Tree Tips For Growth

  • कढीपत्त्याचे रोप लावण्याआधी तुम्ही जी माती तयार करणार आहात, त्यामध्ये शेणखत, माती, वाळू यांचे प्रमाण सारखे ठेवा. अशा प्रकारच्या मातीत कढीपत्ता चांगला वाढतो.
  • कढीपत्त्याला अगदी रोजच्या रोज पाणी घालण्याची गरज नाही एका दिवसात पाणी घातले तरी त्याची वाढ चांगली होते.
  • कढीपत्त्याच्या झाडाला दर दोन महिन्यांनी एकदा शेणखत जरूर घाला त्यामुळे चांगला परिणाम होईल.
  • ताक हे कढीपत्त्यासाठी सर्वोत्तम खत मानले जाते. त्यामुळे 15 दिवसातून एकदा पाणी आणि ताकाचे मिश्रण करून रोपाला घाला.
  • कढीपत्त्याची वेळोवेळी छोटीशी छाटणी करून त्याला सूर्यप्रकाशात ठेवा जास्त ऊन मिळाले तर कढीपत्ता (Curry Tree Tips For Growth) खूप चांगला वाढतो.

या टिप्स फॉलो करून जर तुम्ही तुमच्या कडीपत्त्याच्या झाडाची (Curry Tree Tips For Growth) काळजी घेतली तर तुमच्याकडे पत्त्याचे झाड नक्कीच चांगले वाढेल.