Tuesday, February 7, 2023

बिर्याणीवरून ग्राहकांची हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण, CCTV फुटेज आले समोर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर सध्या एका हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हॉटेलमधील ग्राहक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. या ग्राहकांना जेवण (biryani) द्यायला उशीर झाल्याने त्यांनी थेट हॉटेलच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. बुधवारी 9 नोव्हेंबरला रात्री साडे दहा वाजायच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या परी चौकातील अन्सल प्लाझामध्ये ही घटना घडली आहे. हि संपूर्ण मारहाणीची घटना हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हॉटेलमधील टेबलावर बसलेली तीन माणसे आपले जेवण (biryani) येण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यातील एक इसम अचानकच उठतो आणि हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला मारायला सुरुवात करतो. हा कर्मचारी शांतपणे कंप्यूटरवर काम करत होता. संतापलेला माणूस या कर्मचाऱ्यांकडे आला आणि त्याला मारहाण करू लागला. यानंतर त्याने त्याला मानेला पकडून खेचत बाहेर नेले आणि जमिनीवर ढकलले. इतकंच नाही तर, यानंतर या तीनही माणसांनी त्या कर्मचाऱ्याला हॉटेलच्या बाहेर नेऊन त्याला लाथाबुक्क्यानी मारहाण केली.

- Advertisement -

या संदर्भात माहिती देताना ग्रेटर नोएडाचे डीसीपी म्हणाले की संबंधित तीन इसमांची नावे प्रवेश, मनोज आणि क्रेस अशी आहेत. या तिघांनी चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती. मात्र जेवण (biryani) यायला उशीर होत असल्याने एक व्यक्ती भडकला आणि त्याने तेथील कर्मचारी अल्ताफला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दाखल घेत पोलिसांनी लगेचच या तिघांना ताब्यात घेतले असून संबंधित घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!