CWG 2022 : महिलांच्या 10 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकत Priyanka Goswami ने रचला इतिहास

Priyanka Goswami
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी (Priyanka Goswami) हिने महिलांच्या 10 हजार मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. प्रियांकाने (Priyanka Goswami) हि शर्यत 43:38.82 मध्ये पूर्ण केली. प्रियंका गोस्वामीने या विजयासह नवा इतिहास रचला आहे. या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. प्रियांका गोस्वामीनेही (Priyanka Goswami) टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते पण तिला 17व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत प्रियांकाने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला आहे.

कोण आहे प्रियांका गोस्वामी?
प्रियांका (Priyanka Goswami) ही उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील गडमलपूर सांगरी या गावची रहिवाशी आहे. तिचे वडील एक बस कंडक्टर आहेत. प्रियंका गोस्वामीला आधी जिम्नॅस्ट बनायचे होते. पण अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळालेल्या बक्षिसांकडे ती आकर्षित झाली आणि तिने हा खेळ हाती घेतला. 2021 फेब्रुवारीमध्ये प्रियांकाने विक्रमी वेळेसह 20 किमीची शर्यत जिंकली. प्रियंका गोस्वामी टोकियो ऑलिम्पिकसाठी 1:28.45 च्या विक्रमी वेळेसह पात्र ठरली. मुझफ्फरनगरच्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच पदक जिंकले आहे.

तिसरे पदक
अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक आहे. प्रियांकापूर्वी (Priyanka Goswami), तेजस्वीन शंकर (उंच उडीत कांस्य) आणि एम श्रीशंकर (लांब उडीमध्ये स्लिव्हर) यांनी चालू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये पदके जिंकली. या स्पर्धेत भारताने एकूण 27 पदके जिंकली आहेत.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर