Thursday, February 2, 2023

वराहाच्या धडकेत सायकलस्वार वॉचमनचा मृत्यू

- Advertisement -

औरंगाबाद | कामावर निघालेल्या वॉचमनच्या सायकलला वराहाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चितेगाव जवळ घडली आहे. विलास देवराव आदमाने वय-60 वर्षे (रा.पांगरा, चितेगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अदमाने हे चितेगाव येथे वाचमनची नोकरी करत होते. 25 जून रोजी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ते सायकलवरून कामावर जात असताना रस्त्यात वराहाने त्यांच्या सायकलला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

- Advertisement -

उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.