हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । D Mart तर तुम्हाला माहीतच असेल, तुम्हीही हजार वेळा डीमार्ट ला गेला असेल आणि मोठमोठी खरेदी सुद्धा केली असेल. अंगाच्या साबणापासून ते कपड्यांपर्यंत… किराणा साहित्यापासून ते मुलांच्या खेळण्यापर्यंत… डीमार्टच्या माध्यमातून सर्वच वस्तू एकाच छताखाली मिळत असल्याने फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही डीमार्टची क्रेझ वाढली आहे. त्यातच डीमार्ट मध्ये प्रत्येक वस्तूवर डिस्काउंट असल्याने ग्राहकांची मोठी लगबग पाहायला मिळते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? कि डीमार्ट मध्ये आपण फक्त वस्तू खरेदी करू शकत नाही, तर डीमार्ट च्या मदतीने आपण लाखो रुपये कमवू सुद्धा शकतो…. नाही ना माहित? चला तर मग आम्ही सांगतो तुम्हाला….
मित्रानो, D Martमध्ये जवळपास सर्वच वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली आहे. मग ते किराणा माल असो वा कपडे असो.. तुम्हाला तुमच्या आसपासच्या स्थानिक दुकानदारापेक्षा डीमार्ट मध्ये स्वस्त वस्तू मिळतात. अशावेळी तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि डीमार्ट मध्ये इतक्या कमी किमतीती वस्तू कशा काय मिळतात? तर मित्रानो, यामागेही डीमार्टची मोठी बिझनेस आयडिया आहे, ज्याचा खरं तर तुम्हालाही फायदा होईल. मित्रानो, डीमार्ट अशा व्यापाऱ्यांकडून सामान खरेदी करते जे की त्यांना मार्केट पेक्षा कमी दरात सामान देतात. डीमार्ट व्यापाऱ्यांकडून कमी किमतीत सामान खरेदी करते आणि ग्राहकांनाही कमी किमतीत सामान देते.
डीमार्ट सोबत कसे पैसे कमवाल? D Mart
जर तुमच्याकडे सुद्धा कोणतं प्रॉडक्ट असेल आणि तुम्हाला एकदम त्याची विक्री करायची असेल तर तुम्हीही डीमार्ट सोबत संपर्क करू शकता, डीमार्ट शी जोडू शकता. यासाठी तुम्हाला डीमार्ट सोबत एक करार करावा लागेल. इतरांच्या तुलनेत डीमार्ट तुमच्याकडून कमी पैशात तुमचं प्रॉडक्ट खरेदी करेल, परंतु एकदम जास्तीत जास्त क्वांटिटी तुमच्याकडून डीमार्ट खरेदी करेल. म्हणजेच काय, तर जरी नफा कमी असला तरी एकदम जास्त विक्री झाल्याने तुम्ही शेवटी फायद्याच्याच राहणार आहात. या करारासाठी तुम्हाला https://www.dmartindia.com/partner-with-us या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. दर डीमार्ट विक्रेत्यांसोबत संपर्क साधत असते. डीमार्टला तुमचं प्रॉडक्ट आवडलं तर नक्कीच ते तुमच्याशी करार करतील आणि तुमचं प्रॉडक्ट थेट डीमार्ट मध्ये विक्रीसाठी ठेवलं जाईल. मधल्या काळात हि प्रक्रिया बंद होती, मात्र ही ती पुन्हा सुरू झाली आहे.




