हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । D Mart तर तुम्ही नक्कीच सतत जात असाल आणि नवनवीन वस्तूंची आणि सामानाची खरेदी करत असाल. आपल्या समोर डीमार्ट म्हटले कि भलं मोठं किराणामालाचे दुकान,महागड्या कपड्याची दुकाने, स्मार्टफोन मोबाईलचे दुकाने, सर्वत्र असणारी स्वच्याता,आकर्षक वस्तू असं चित्र उभा राहतं .देशातील प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात अनेक डी मार्टची दुकाने उभी आहेत. देशातील श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांची पसंती डी मार्टला असते.आपल्या दैनदिन जीवनात उपयोगी पडणारी प्रत्येक वस्तू हि डी मार्ट मध्ये मिळत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने डीमार्टच्या खरेदीला प्राधान्य देत असतात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाळी ,दसरा, अशा सनानिमित्य सवलतीच्या मोठ्या बंपर ऑफर असतात त्याचा देखील लाभ ग्राहक घेतात.पण ग्राहकांना अनेक वेळा प्रश्न पडला असेल कि बिल देऊन बाहेर जाताना बिलावर शिक्का का मारत असतील? शिक्का मारून नेमकं काय साध्य होतंय? चला तर जाणून घेऊयात…
या 7 कारणामुळे डी मार्टमध्ये बिलांवर शिक्का मारतात– D Mart
1) आपल्या स्टोअरला भेट दिलेल्या ग्राहकांला विश्वास आणि पारदर्शकता वाटावी.
2) डी मार्ट स्टोअरमधील वस्तूंच्या चोरीचे प्रकार टाळण्यासाठी बाहेर पडताना क्रॉस पद्धतीने वस्तू चेक करतात. त्यानंतर बिलावर शिक्का मारला जातो.
३) D Mart च्या बिलावर शिक्का मारला जातो कारण ते बिल वैध (valid) आहे आणि खरेदीची नोंद झाली आहे, हे दाखवण्यासाठी
४) काही वेळा बिलात देखील चुका होऊ शकता. मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक बिघाडांमुळे होऊ शकतात.तसेच वस्तू चुकीच्या पद्धतीने स्कॅन केल्या जाऊ शकतात, त्यांचे वजन चुकीचे असू शकते किंवा किंमत चुकीची असू शकते. हि गोष्ट एक्झिट चेक दरम्यान आढळून येतात.
५) बिलावर शिक्का मारल्याने, खरेदीची नोंद व्यवस्थित झाली आहे, हे तपासले जाते. यामुळे, मालाची विक्री आणि एकूणच व्यवहार व्यवस्थितपणे रेकॉर्ड होतो.
६) बिलावर शिक्का मारल्याने, बिलात फेरफार करणे किंवा त्याची कॉपी करणे अवघड जाते. यामुळे चुकीच्या गोष्टीना आळा बसतो.
७) कधी कधी आपण एखादी वस्तू रिटर्न करायला जातो, त्यावेळी बिलावर शिक्का असणे गरजेचं असते.
दरम्यान, देशातील रिटेल क्षेत्रात काम करणारी D Mart हि आघाडीची कंपनी आहे. आज देशात डी मार्टचे जाळे १२ राज्यात पसरले असून ४१५ हून अधिक स्टोअर उभारले आहेत. माणसाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, मग त्या कपड्यांपर्यंत ते अगदी किचन मधील भांड्यांपर्यंत… आंघोळीच्या साबणापासून ते गहू- तांदळापर्यंत , कोणती वस्तू नाही असं कधीच डीमार्ट मध्ये बघायला मिळणार नाही.,,, ग्राहकांना सर्वकाही एकाच छताखाली देणाऱ्या डीमार्टची स्थापना केली राधाकृष्ण दमाणी यांनी… मुंबईतून सुरु झालेलं डीमार्ट पुढे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. डीमार्टच्या माध्यमातून हजारो युवकांना नोकऱ्याही मिळत आहेत.




