Dahanu Nashik Railway | आपल्या देशामध्ये रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. अनेक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि कमी पैशात असतो. त्यामुळे बरेचसे लोक हे रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. अशातच आता एक नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहे. हा रेल्वे मार्ग दोन मोठ्या शहरांना जोडणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ देखील खूप कमी होणार आहे. हा रेल्वे मार्ग नाशिक आणि डहाणू (Dahanu Nashik Railway) दरम्यान होणार आहे. या मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे. या नवीन रेल्वे मार्गासाठी 100 किलोमीटरची लाईन त्रंबकेश्वर ते वानगावमधून जाणार आहे. हा एक मोठा रेल्वे मार्ग झाल्यावर आता दोन शहरांमधील अंतर देखील खूपच कमी होणार आहे. आणि त्यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच या दोन शहरांमधील वाहतूक पर्यटक आणि आर्थिक देवाण-घेवाण देखील अत्यंत सुलभ पद्धतीने होणार आहे. हे पालघर जिल्ह्यातील नाशिक आणि डहाणू या दोन शहरांना रेल्वे मार्ग जोडण्यात येणार आहे.
सरकारचा हा नवा प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने खूप फायद्याचा असणार आहे. अशी देखील अपेक्षा ठेवली जात आहे. या रेल्वे मार्गामुळे आता पर्यटकांचा फायदा होणार आहे. म्हणजेच आता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरला नाशिक मधील पंचवटी पर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे. भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणाचा प्रभाव तसेच खर्च यासारख्या घटकांचा विचार केला, तर हा मार्ग अत्यंत सोयीचा आणि कमी खर्चात होणार आहे. त्यामुळे नाशिक येथील पर्यटकाला देखील चालला मिळणार आहे. नाशिकमधील पंचवटी येथे दरवर्षी कितीतरी हजारो भाविक भेट देत असतात. आता या रेल्वे मार्गामुळे त्यांचे प्रवास करण्याचा वेळ देखील वाचणार आहे.
या नवीन रेल्वे मार्गामुळे (Dahanu Nashik Railway) बरेच फायदे होणार आहे. यातील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या रेल्वे मार्गामुळे नाशिक प्रमुख औद्योगिक आणि धार्मिक केंद्र तसेच डहाणू येथील लोकांची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. नवीन मार्ग तयार झाल्यामुळे आता प्रवाशांना तसेच मालवाहतूक करणाऱ्यांना अधिक जलद गतीने आणि चांगल्या पद्धतीने प्रवास करता येणार आहे. या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये रेल्वेचा मार्ग कुठून जाणार आहे त्याची जोडणी कशा प्रकारे होईल यासाठी किती आवश्यक जमीन असेल. पुलांचे ठिकाण कोणते या सगळ्याच्या गोष्टींची माहिती घेणे चालू आहे. आणि लवकरच हे काम देखील चालू होणार आहे. हा रेल्वे मार्ग तयार झाल्यावर दोन शहरातील प्रवासाचे वेळ खूप कमी होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार, सफाळा, पालघर, बोईसर, डहाणू येथील लोकांना नाशिकला रेल्वेने प्रवास करणे अगदी सोपे होणार आहे.