व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आधी प्रेयसीला दारू पाजली अन् नंतर आरोपीने तिच्यासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील दहिसर ह्या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दारू पाजून तरुणीला मारहाण (assaulting a young woman) करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात दहिसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दिंडोशी येथील गोरेगाव परिसरात राहणारी 21 वर्षीय पीडित तरुणी एका मोठ्या आयटी कंपनीत काम करते, तिची अमेय दरेकर या तरुणाशी शाळेपासून ओळख आहे. त्यांचे एकमेकांबरोबर प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी पीडिता ही प्रियकर अमेय दरेकर आणि त्याच्या मित्रासोबत रात्री 9 पासून ते 12.30 वाजेपर्यंत बिल्डिंगच्या टेरेसवर आणि नंतर टेरेसच्या वर बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर दारू पीत बसले होते, तेव्हा दारू संपल्यावर अमेयचा मित्र त्याच्या फ्लॅटमध्ये झोपायला गेला. मात्र अमेय आणि पीडिता दोघेही पाण्याच्या टाकीवर बसून होते. त्यानंतर अचानक पीडिता गच्चीवरील टाकीवरून खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत (assaulting a young woman) झाली.

यानंतर तिचा प्रियकर अमेय दरेकर हा तिला त्याच्या घरी घेऊन गेला. मात्र सकाळी तिला रुग्णालयात न नेता त्याने तिला तिच्या घरी सोडलं. पीडितेचे आई-वडील मॉर्निंग वॉकवरून परतले असता त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. यानंतर पीडित तरुणीच्या पालकांनी तिला मालाड येथील खाजगी रुग्णालयात नेले. या ठिकाणी डॉक्टरांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर तिला कोकिला बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक (assaulting a young woman) असल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीचा प्रियकर अमेय दरेकर याला अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!