पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत! Dailyhunt च्या ‘ट्रस्ट ऑफ नेशन’ सर्वेत 64% लोकांचे मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| डेलीहंटकडून (Dailyhunt) करण्यात आलेल्या “ट्रस्ट ऑफ नेशन”च्या (Trust Of Nation) सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या सर्वेक्षणात तब्बल 64% लोकांनी पुढील काळामध्ये नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान म्हणून पाहिला आवडेल, असे सांगितले आहे. त्यामुळे हा सर्वेक्षण अहवाल पाहून काँग्रेसला धक्का बसू शकतो. महत्वाचे म्हणजे, या सर्वेक्षणाचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी डेलीहंट सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे.

77 लाखांहून अधिक लोकांकडून प्रतिसाद

नुकताच डेलीहंटने 11 भाषांमध्ये लोकसभा निवडणूक 2024 चा सर्वे केला. या सर्वेमध्ये एकूण 77 लाख सहभागींचे मत नोंदवण्यात आले. या सर्वेक्षणामधूनच देशातील जनतेचा कौल नरेंद्र मोदींच्या बाजूने असल्याचे दिसून आले. तसेच लोकसभा निवडणुकीत NDA ला बहुमत मिळेल, असा 63 टक्के लोकांनी विश्वास दाखवला.

2024 च्या निवडणुकांबाबत खास गोष्टी

  • या सर्वेक्षणात पाचपैकी तीन टक्के लोकांनी निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील , अशी प्रतिक्रिया दिली. तर 21.8 टक्के लोकांनी राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास दाखवला.
  • सर्वेक्षणातील तीनपैकी दोन टक्के लोकांनी असा विश्वास दाखवला की, 2024 मध्ये भाजप/एनडीएची युती लोकसभा निवडणूक जिंकेल.
  • दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर सर्वेक्षणानुसार, याठिकाणी ही पंतप्रधान मोदी 57.7% मतांसह आघाडीवर आहेत. तसेच राहुल गांधींना 24.2% मते मिळाली आहेत. याबरोबर योगी आदित्यनाथ यांना 13.7% मते मिळाली आहेत.
  • डेलीहंटच्या सर्वेक्षणात यूपीमध्ये यंदाच्या निवडणुकीत पीएम मोदींना पहिली पसंती मिळाली आहे. ज्यात त्यांना 78.2% मते देण्यात आली आहेत. तर राहुल गांधी यांना 10 टक्के मते मिळाली आहेत.
  • या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमध्ये 62.6% मते मिळाली आहे. तर राहुल गांधींना 19.6% आणि ममता बॅनर्जी यांना फक्त 14.8% मते मिळाली आहेत.

पंतप्रधान मोदींची दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्पर्धा

  • सर्वेक्षणनुसार, तामिळनाडूमध्ये राहुल गांधींना 44.1 टक्के तर नरेंद्र मोदींना 43.2 टक्के पाठिंबा देण्यात आला आहे.
  • तसेच केरळमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्यात चुरशीची लढत पाहिला मिळत आहे. या सर्वेक्षणात पीएम मोदींना 40.8% आणि राहुल गांधींना 40.5% मते मिळाली आहेत.
  • तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 60.1 टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे राहुल गांधी यांना 25.6 टक्के मते मिळाली आहेत. परंतु एन. चंद्राबाबू नायडू 6.6% मतांनी पिछाडीवर आहेत.
  • आंध्र प्रदेशात पंतप्रधान मोदींना 71.8 टक्के मते मिळाली आहेत. राहुल गांधी यांना 17.9 टक्के मते मिळाली आहेत. तर एन. चंद्राबाबू नायडू यांना केवळ 7.4% मते मिळाली आहेत.

परराष्ट्र धोरण

परराष्ट्र धोरणाबाबतही करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 64 टक्के लोकांनी एनडीएच्या कामावर समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे.

आणीबाणीचा काळ

सर्वेक्षणानुसार, 63.6 टक्के लोकांनी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाविषयी कौतुक केले आहे. तर 20.5 टक्के लोकांनी ‘नाखुशी व्यक्त केली आहे. यात 10.7 टक्के लोकांनी ‘तटस्थ’ म्हणून प्रतिक्रिया दिली आहे.

कल्याणकारी उपक्रम

निम्म्याहून अधिक लोकांनी (53.8%) केंद्र सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तर 24.9 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.