Dal- Rice Price | गरिबांचा डाळ – भातही महागला; जाणून घ्या तांदूळ आणि डाळीच्या वाढलेल्या किमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dal- Rice Price | मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये पाऊस अगदी कमी प्रमाणात पडला. त्यामुळे तांदूळ उत्पादनात देखील घट झालेली होती. तांदळाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे तांदळाच्या किमती ही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सध्या महागाई गगनाला भिडलेली आहे. अगदी भाजीपाल्यासह घरातील सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत. त्यामुळे आता तांदूळ आणि डाळींच्या किमती देखील वाढणार आहे. आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मागील वर्षाचे तांदळाचे (Dal- Rice Price) दर जर आपण पाहिले तर मागील वर्षी तांदूळ साडेचार हजार रुपये क्विंटल दराने विकला जात होता. परंतु आता यावर्षी हे दर वाढलेले असून तो तांदूळ आता साडेपाच हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. बाजारामध्ये आंबेमोहर आणि इंद्रायणी या तांदळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु आता या तांदळाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. तरी देखील अनेक नागरिक हे तांदूळ खरेदी करताना दिसत आहेत.

चिनोर या तांदळाच्या दराबद्दल पाहिले तर या तांदळाचे जर 6 हजारांवरून 7500 रुपयांनी वाढलेले आहे. डाळ आणि भात हा गरीब लोकांचा मुख्य आहार मानला जातो. परंतु आता तो डाळ भात खाणे देखील आता सामान्य नागरिकांना परवडणार नाही. कारण त्याच्यासाठी देखील अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

डाळीच्या दरात कितीने वाढ | Dal- Rice Price

मागील 15 दिवसांमध्ये डाळींच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तुरीची डाळीची किंमत ही 40 ते 50 रुपयांनी वाढली आहे. मागील महिन्यामध्ये तुरडाळीचा भाव हा 140 ते 145 रुपये प्रति किलो होता. परंतु आता ही डाळ 180 ते 190 रुपये किती किलोने विकली जात आहे. हरभरा डाळ ही 70 ते 72 रुपयांवरून थेट 90 ते 95 रुपये किलोवर पोहोचलेली दिसत आहे.

केवळ तांदूळ आणि डाळीच्याच किमती नाही, तर यावर्षी उष्णता जास्त प्रमाणात वाढल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव देखील वाढलेले आहेत. बाजारात कोथिंबिरीची एक जुडी 50 ते 60 रुपयांवर पोहोचलेली आहे. तसेच मेथी कोथिंबीर कांदापातीसह पालेभाज्यांचा भाव 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे.