चोरीचा आळ घेत दलित तरूणांना झाडाला लटकवून मारहाण; आरोपींवर कडक कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या नुकताच सोशल मीडियावर एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील वर्गमित्रांकडून कानाखाली वाजवण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिकाच मुस्लिम विद्यार्थ्याला आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असताना आता एका दलित तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे देशात जातीय अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे या दलित तरुणांना चोरीच्या आरोपामुळे झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हरेगाव येथील या दलित तरुणांवर शेळी आणि कबुतर चोरल्याचा आरोप गावातील काही लोकांनी लावला होता. मात्र दलित तरुणांनी आपला गुन्हा कबूल न केल्यामुळे काही लोकांनी त्यांना घरातून उचलून नेत झाडाला उलटं लटकवले. तसेच, तरुणाला झाडाला उलटे लटकून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मात्र या प्रकाराला थांबवण्यासाठी गावातील एकही नागरिक पुढे आला नाही.

संबंधित घटनेतील पिडीत तरुण नाव शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणि खंडागळे हे सध्या जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिरापूर येथील हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता जवळील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, दलित तरुणांच्या मारहाणीच्या व्हिडिओसोबत सध्या एका शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्यासोबत झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तर, एक शिक्षिकाच मुस्लिम विद्यार्थ्यांच्या वर्ग मित्रांना त्याला कानाखाली लावायला सांगत आहे. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये जातीय द्वेषाचे प्रमाण वाढत चालले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.