आनंदाबाबत साताऱ्याची प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार म्हणते….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्रात सध्या चर्चेत असणारी प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार हिने नुकताच आपला वाढदिवस साताऱ्यातील कोडोली आशा भवन येथील मतिमंद मुलांच्या शाळेत साजरा केला. यावेळी तिने वाढदिवस सर्वांनाच छान वाटत असतो. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पाहतो तेव्हा आपल्या खूप आनंद होतो, असे म्हंटले आहे.

सातारा येथील कोडोलीत नृत्यांगना माधुरी पवार हिने आपला पूर्ण वेळ गतिमंद शाळेतील मुलांच्या समवेत घालवेळा. यावेळी माधुरी हिने मुलांना शालेय वस्तूंची भेट दिली. या वाढदिवसानिमित्त आशा भवन शाळेतील मुलांना भेटवस्तू देताना खूप समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया माधुरी पवार हिने दिली आहे.

दरम्यान, वाढदिवसाचा कार्यक्रम पाहिल्यानंतर गतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. छान छान भेटवस्तू घेतल्यानंतर मुलांनीही माधुरी पवार हिला वाढदिवसाच्या शुभेच्छया दिल्या.