नवी दिल्ली वृत्तसंस्था : ‘आजतक’ या प्रसिद्ध हिंदी न्यूज चॅनलच्या प्राईम शो मधील ‘दंगल’ चा आवाज आता कायमचा शांत झालाय… प्रसिद्ध न्युज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोना संसर्ग झाल्याने आज सकाळी निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या रोहित सरदाना यांच्या अकाली एक्झिटमुळे पत्रकारिता क्षेत्रात दुःख व्यक्त केले जात आहे.
हरियाणाच्या कुरुक्षेत्रात राहणाऱ्या रोहित सरदाना यांना बेस्ट अँकर एनटी अवॉर्ड, हिन्दी पत्रकारितेतील प्रतिष्ठित गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला आहे. ते भारतातील सर्वात लोकप्रिय असे न्यूज अँकर होते. त्यांनी ईटीव्ही, सहारा समय, झी न्यूज त्यानंतर आज तक मध्ये काम केलं चॅनलच्या माध्यमातून त्यांचा आवाज घरोघरी पोहोचला होता. आज तक च्या प्राईम शोध ‘दंगल’ च्या माध्यमातून त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती.
रोहित सरदाना यांनी आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते असो किंवा विरोधी पक्षातील नेते दंगल मध्ये सर्वांचीच बोलती ते बंद करत असत. एवढेच नव्हे तर ते सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह होते. त्यांचे लाखो फॅन फॉलोवर्स होते. JNU मधील देशविरोधी घोषना, काश्मीर खोऱ्यात नेत्यांचे पाकिस्तान कनेक्शन यासारख्या अनेक मुद्द्यावरून त्यांनी अजेंडा सेट केला होता. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केलं जात आहे.