Data About Gold Loan Fraud | आपल्याला बँक विविध प्रकारचे लोन देत असते. घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, लग्न करण्यासाठी त्याचप्रमाणे शेतीतील अनेक अवजारे घेण्यासाठी त्याचप्रमाणे अगदी गोल्ड लोन देखील बँका या आपल्याला उपलब्ध करून देतात. परंतु बरेच लोक असे असतात की जे बँकेचे लोन परत नाही देत नाही. त्यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता या गोल्ड लोन फसवणुकी प्रकरणबाबत आरबीआयने बँकांना फसवून पोर्टफोलिओमधील डिफॉल्ट आणि पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले आहे. त्याची माहिती देण्यास सांगितलेले आहेत.
आरबीआयने बँकांना कोणत्या सूचना दिल्या?
हाती आलेल्या माहितीनुसार गोल्ड लोन (Data About Gold Loan Fraud) संबंधीच्या माहिती व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेने बँकांना इतर काही सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बँकांना कर्ज घेण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यास सांगितले आहे. जेणेकरून बँकेची कर्ज घेण्याची प्रक्रिया जी आहे. ती रिझर्व बँक ठरवून देईल आणि त्यानुसार त्यांना करावे लागेल.
या प्रकरणामुळे मागवला डेटा | Data About Gold Loan Fraud
सोन्याच्या कर्जाच्याबाबत बँकेत जे कर्मचारी आहेत ते इतर गोष्टींची देखील छेडछाड करतील, अशी भीती आरबीआयने व्यक्त केलेली आहे. या सारखी प्रकरणी या आधी देखील समोर आलेली आहेत. याआधी 2 सरकारी बँकांच्या संबंधित अशी प्रकरण घडलेली आहेत. ज्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या गोल्ड लोनचे लक्ष पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे यंत्रणेत फ्रॉड केला आहे.
मागील ही दोन प्रकरणी लक्षात घेता रिझर्व बँक ऑफ इंडियाने सगळ्या बँकांकडून हा डेटा मागवलेला आहे. यावेळी एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रिझर्व बँक स्वतःहून देखील हा गोल्ड लोनचा डेटा (Data About Gold Loan Fraud) एक्सेस करू शकते.
नुकतेच काही दिवसापूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाला काही बँकांमध्ये गोल्ड लोनचे घोटाळे होत आहेत. अशी प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ग्राहकांना कोणतीही गोष्ट तारण न घेता गोल्ड लोन दिले होते. म्हणजेच त्यांच्याकडून सोने गहाण न ठेवता लोकांना गोल्ड लोन दिले होते. परंतु आणि काही वेळाने ग्राहका मिळून संपूर्ण पैसे भरण्यात देखील आले. आणि कर्मचाऱ्यांनी ही कर्ज प्रक्रिया शुल्क बँकेच्या खर्चाच्या खात्यातून भरले अशाप्रकारे ही प्रकरण समोर आल्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाने सगळ्यात बँकांकडून गोल्ड लोनचा डाटा मागवला आहे. जेणेकरून त्या कोणत्या बँकांमध्ये घोटाळा होत आहे हे त्यांना समजेल. या आधी देखील अशी अनेक प्रकरणासमोर आल्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.