अर्थसंकल्पात काले गावासाठी तब्बल 3 कोटी 50 लाख मंजूर; दयानंद पाटील म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अक्षय पाटील
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानभवनात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी कराड तालुक्यातील एकूण 54 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. यावेळी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणाऱ्या काले या गावामध्ये सुद्धा जवळपास 3 कोटी 50 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या मंजुरींनंतर काले गावचे नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य दयानंद पाटील यांनी राज्य सरकार आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्यासह माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

कालेटेक कमान ते काले रस्ता सुधारणासाठी 2 कोटी आणि काले गावच्या रस्ते नूतनीकरण, गटारे, सरक्षण भिंत या विकासकामांसाठी 1 कोटी 50 लाख असा सुमारे 3 कोटी 50 लाख कोटींपर्यंतचा निधी मंजूर झाला आहे. यानंतर “हॅलो महाराष्ट्रा”शी बोलताना दयानंद पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. आमचे नेते डॉ. अतुल भोसले आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी या 3 कोटी 50 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली अशी प्रतिक्रिया दयानंद पाटील यांनी दिली.

येत्या काळात सर्वसामान्य लोकांसाठी 1 कोटी 66 लाखांच्या पेयजल योजनेचं काम सुरु होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मराठी शाळेच्या 6 खोल्यांच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली असून ते काम सुद्धा प्रोसेस मध्ये आहे. याशिवाय गावात अशाप्रकारची अनेक विकासकामे सुरु आहेत. काले गावच्या विकासासाठी कायमच मी कटिबद्ध आहे असे दयानंद पाटील यांनी “हॅलो महाराष्ट्रा”शी बोलताना म्हंटल.

दरम्यान, येत्या काळात सातारा जिल्ह्यात बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत दयानंद पाटील यांना विचारलं असता आमचे नेतेमंडळी जे काही ठरवतील त्याप्रमाणे चालू असं सूचक विधान करत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.