DCB Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DCB Bank  : RBI ने नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. यामध्ये आता खाजगी क्षेत्रातील मुंबईस्थित DCB बँकेने FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत.

DCB Bank Q1 Review - Sticks To Growth Targets, Investing Heavily In Supporting Infra: Nirmal Bang

1 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

हे लक्षात घ्या कि, DCB Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. 1 ते 10 वर्षांच्या डिपॉझिट्सवर नवीन दर वाढवण्यात आले आहेत. या बदलानंतर आता बँकेने 18 महिने ते 120 महिन्यांच्या रिटेल एफडीवर 50 पॉंईटस किंवा 0.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढवले ​​आहेत.

DCB Bank च्या FD वर जास्तीत जास्त 7.10 टक्के व्याज दर

DCB Bank कडून सध्या 7 दिवसांपासून ते 120 महिन्यांच्या डिपॉझिट्ससाठी 4.80 टक्के ते 7.00 टक्के पर्यंत FD व्याजदर दिला जातो आहे. तसेच 700 दिवस ते 36 महिन्यांच्या FD वर जास्तीत जास्त 7.10 टक्के व्याज दर दिला जातो आहे.

FAQs about fixed deposits

डीसीबी बँकेच्या एफडीचे दर

DCB Bank कडून आता 7 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.80% व्याजदर मिळेल. तसेच 91 दिवस ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50%, 6 महिने ते 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.70% आणि 12 महिन्यांच्या FD साठी 6.10% व्याजदर मिळेल.

त्याच प्रमाणे आता 12 महिन्यांपेक्षा जास्त ते 15 महिन्यांपेक्षा कमी आणि 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर अनुक्रमे 5.75% आणि 6.75% व्याजदर मिळेल. हे लक्षात घ्या कि, बँकेने 18 महिन्यांपासून ते 700 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 6.60% वरून 6.75% केला आहे. बँकेने 700 दिवसांपासून ते 36 महिन्यांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता या कालावधीसाठी 7.10 टक्के व्याज दर दिला जाणार आहे. तसेच 36 महिने ते 120 महिन्यांच्या डिपॉझिट्सवर आता 7.00% व्याज दर दिला जाईल.जो याआधी 6.60% होता.

DCB Bank reflects pain of small businesses but valuation still attractive | Mint

रेपो दर 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर आणला आहे. जो गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलले गेले आहे. याआधीही रेपो दरात मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी तसेच जून आणि ऑगस्टमध्ये मिळून 0.50-0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मे पासून आत्तापर्यंत RBI ने रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली गेली आहे. DCB Bank

‘या’ बँकांनी वाढवले ​FD चे दर

अलीकडेच RBL बँक, Axis बँकांनी देखील FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dcbbank.com/dcb-fixed-deposits/deposit-rates

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे ताजे दर तपासा

Axis Bank ने आपल्या FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा

Stock Market : जागतिक बाजार अन् परदेशी गुंतवणूकदारांसह ‘हे’ घटक ठरवणार शेअर बाजाराची दिशा

‘या’ Multibagger Stock मध्ये पैसे गुंतववून गुंतवणूकदारांनी कमावला कोट्यावधींचा नफा !!!

Bank Of India ने FD वरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवीन दर