Monday, March 20, 2023

कोयना पुलाजवळ दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

- Advertisement -

कराड प्रतिनिधी।सकलेन मुलाणी
मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना रविवारी (दि.26) घडली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी बुडालेला राहुल गणेश परिहार (रा. आगाशिवनगर, ता. कराड) यांचा जुन्या कोयना पूलाजवळ मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळला. या दुर्घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (दि. 25) आनंदराव चव्हाण विद्यालयाचा दहावीचा निरोप समारंभ झाला आणि रविवारी राहुल आपल्या मित्रासोबत पोहायला गेला होता. नदीत पोहताना सोबतच्या इतर मुलांनी राहुल बुडत असल्याचे पाहिल्यानंतर तात्काळ त्याच्या कुटुंबियांना राहुल बुडाल्याची माहिती दिली. राहुलच्या कुटुंबियांनी नदीपात्राकडे धाव घेऊन शोध घेण्याचे काम सुरू केले. मात्र रविवारी व सोमवारीही राहुल सापडला नाही.

- Advertisement -

दरम्यान, राहुल परिहार हा नदीपात्रात बुडाल्याची घटना समजताच आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर व आगाशिवनगर परिसरात शोककळा पसरली. राहुल हा दहावीत होता त्याचा निरोप समारंभ शनिवारी पार पडला व रविवारी राहुल कोयना नदी पात्रात बुडाला. अखेर तीन दिवसांनी घडलेल्या घटनास्थळावरून अंदाजे 1 किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाले असून पीएसआय फडतरे अधिक तपास करीत आहेत.