हॉटेलच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक थेट हॉस्पीटलमध्ये Admit

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे सदर बाधित ग्राहकाचे नाव असून याप्रकरणी बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी कोणतीही FIR दाखल करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राजीव शुक्ला हे 8 जानेवारी 2004 रोजी प्रयागराजवरुन मुंबईत आले होते. होता. त्यानंतर त्यांनी बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं. मात्र जेवत असताना त्यांना काहीतरी वेगळीच चव लागली. म्हणून त्यांनी डब्यातील जेवणाकडे व्यवस्थित बघितलं असता त्यांना त्यामध्ये मेलेला उंदीर आणि झुरळ दिसले. एवढच नव्हे तर काही क्षणातच त्यांना पोटात मळमळ आणि विषबाधा संदर्भातील तक्रारी जाणवू लागल्या. त्यांचा त्रास इतका वेगाने वाढला की त्यांना 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत या सदर हॉटेल विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी लेखी तक्रार स्वीकारली मात्र अजून तरी FIR दाखल केलेली नाही.

राजीव शुक्ला यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा शेअर केली. त्यामध्ये त्यांनी स्वतःचा हॉस्पिटल मधील फोटो, जेवणातील मेलेला उंदीर, हॉटेलचे बिल चा फोटो लोकांना दाखवला. त्यांनी म्हंटल कि, प्रयागराज येथील मी राजीव शुक्ला यांनी मुंबईला भेट दिली. मी 8 जानेवारी 24 रोजी रात्री बार्बेक्यू नेशन, वरळी आउटलेट, मधून व्हेज मील बॉक्स ऑर्डर केला ज्यामध्ये मृत उंदीर होता. मला 75+ तासांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. नागपाडा पोलिसात तक्रार दाखल करूनही अद्याप माझी एफआयआर दाखल करण्यात आली नाही. असे त्यांनी सांगितलं.